
हलकंफुलकं
ग्रुपमधील पोस्ट्स वाचून मनाला प्रसन्न, छान वाटले पाहिजे. मन आनंदित झाले पाहिजे. अशा पद्धतीच्या पोस्ट्स ग्रुप मध्ये टाका. विनोद, कथा, कविता, चारोळ्या अशा गोष्टी ग्रुपमध्ये टाकाव्यात. माहितीपर आणि प्रबोधनपर लेख सुद्धा चालतील; पण सगळ्या पोस्ट्स खालील नियम पाळणाऱ्या असाव्यात. १) राजकीय, जातीय, धार्मिक, वांशिक, प्रांतिक अथवा लैंगिक टीकाटिप्पणी करणाऱ्या पोस्ट्स नकोत. २) जातीय अथवा धार्मिक द्वेष वाढवणाऱ्या पोस्ट्स कुणीही टाकू नयेत. ३) महिलांचा आदर करावा. ग्रुपमधील महिलांना कुणीही परस्पर मेसेज करू नयेत. महिलांचा उपमर्द होईल अशा पोस्ट्स ग्रुप मध्ये टाकू नयेत. कुणाकडून काही गैरवर्तन झाले तर त्याच्याविरुद्ध योग्य ती (आवश्यकता भासल्यास कायदेशीर सुद्धा) कारवाई केली जाईल. ४) प्रबोधनाच्या पोस्ट्स म्हणजे कुठल्याही जाती-धर्मावर अनावश्यक टीका करणाऱ्या पोस्ट्स नव्हे, हे लक्षात घ्यावे. आपल्या मांडणीला योग्य तो आधार असायला हवा. ग्रुपचा हेतू आनंद निर्माण करणे हा आहे. ग्रुपचा हेतू लक्षात घेऊन पोस्ट्स टाकाव्यात ही विनंती. ५) कोणत्याही पद्धतीच्या जाहिराती, प्रमोशन, फेक मेसेजेस, अंधश्रद्धा पसरवणारे मेसेज इथे चालणार नाहीत. ६) कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार इथे करू नये. ७) अश्लील मेसेज, फोटो, व्हिडिओ अजिबात टाकू नयेत. ८) नियम मोडणाऱ्या व्यक्तीला ग्रुपमधून काढून टाकले जाईल. ९) हा एक चांगला मराठी विनोदी व्हाट्सअप ग्रुप होईल याची काळजी आपण सर्वजण घेऊया. १०) ग्रुप आवडल्यास ग्रुपची लिंक आपल्या मित्रमंडळींना शेअर करू शकता.
The WhatsApp group हलकंफुलकं is a Marathi WhatsApp group. It is a Comedy/Funny WhatsApp group, and is a India WhatsApp group. To join this group click on 'Join Group' Button.

